ठाणे - डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत असलेला एक १७ वर्षीय कोरोना संशयित तरुण मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या खिडकीतून पळून गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत झालेल्या एका विवाह सोहळ्यामधील १६ कोरोना संशयित रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकीच हा एक क्वारंटाईन केलेला युवक होता. सध्या विष्णूनगर पोलीस या युवकाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा...औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
कल्याण-डोंबिवली शहरात झालेल्या एका लग्न सोहळ्यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याची बातमी 'ई टीव्ही भारत'ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून त्या लग्न सोहळाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांची यादी तयार करून त्यांना होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काही नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाने १६ जणांना शास्त्रीनगर रुग्णालयात क्वॉरंटाइन केले होते. त्यापैकीच एक अल्पवयीन युवक देखील कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यालाही रुग्णालयात क्वॉरंटाइन केले होते. मात्र, हाच तरुण शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या खिडकीतून पळून गेला. यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा...औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, येथील रुग्णांना वेळेवर जेवण, औषधे दिले जात आहेत. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून काही संशयितांवर देखील याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात क्वॉरंटाइन असलेला एक तरुण शनिवारी रात्री पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यातच हा तरुण लग्न सोहळ्यात उपस्थित होतो आणि कोरोना बाधिताच्या संपर्कात आला होता. त्यामुळे या तरुणाला क्वॉरंटाइन करण्यात आले होते, अशी माहिती विष्णूनगर पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.