महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनारुग्णांत वाढ

लोक हेतूपुरस्सर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे.

Corona
Corona

By

Published : Feb 16, 2021, 9:13 PM IST

ठाणे - मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात नियंत्रणात आलेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियंत्रित आलेल्या ठाणे जिल्ह्यातील कोरोना पुन्हा एकदा पसरू लागला आहे.

गर्दीच गर्दी

राज्य शासनाने अनलॉक केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका तसेच अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला होता. त्यामुळे अनेक लोक बिनधास्तपणे विनामास्क बाजारात येऊ लागले होते. याचा परिणाम पुन्हा दिसू लागला आहे. त्यातच राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी सर्वसामान्य लोकांसाठी लोकल रेल्वेची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारात, रेल्वे स्थानकांवर, रस्त्यांवर, चौकांमध्ये, उपाहारगृहांमध्ये गर्दीच गर्दी दिसू लागली आहे.

सूचनांकडे दुर्लक्ष

जिल्हा प्रशासन तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका प्रशासन लोकांना वारंवार सांगूनही मास्क अनिवार्य आहे, अशा सूचना देत असताना लोक मात्र हेतूपुरस्सर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शहरातील कोरोनाची संख्या ही काही दिवसांपूर्वी अवघ्या 54 रुग्णांवर येऊन ठेपली होती, ती आता वाढली आहे. शंभरच्या घरात जाणारी ही संख्या 90, 95च्याही पुढे जात आहे.

तारीख आणि बाधित रुग्णसंख्या

  • 10 फेब्रुवारी - 99
  • 11 फेब्रुवारी - 74
  • 12 फेब्रुवारी - 81
  • 13 - फेब्रुवारी 89
  • 14 - फेब्रुवारी 91

ABOUT THE AUTHOR

...view details