नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना लसीकरणासाठी 50 केंद्र बनविण्यात आले असून, आज 4 केंद्रात 400 आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सीबीडी बेलापूर मधील अपोलो, व नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात लसीकरण केले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आज लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड काळात आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या कोविड योद्धयांचे आज लसीकरण केले आहे.
शहरातून १९ हजार ८५ कोविड योद्ध्यांची नोंद
नवी मुंबई महापालिकेच्या कोविन अॅपवर लसीकरणासाठी १९ हजार ८ लोकांची नोंदणी झाली आहे. संबधित व्यक्तींचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे, यासंदर्भात मोबाईलवर माहिती प्राप्त होणार आहे.
२१ हजार लस
नवी मुंबई पालिकेला २१ हजार लस देण्यात आल्या असून, महापालिकेची वाशी व ऐरोली दोन सार्वजनिक रुग्णालये व नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सी. बी. डी. बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात लसीकरण ४०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.