नवी मुंबई -पनवेलमध्ये अजून एका कोरोना रूग्णाची वाढ झाली आहे. ओला कॅब ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी, उलवा परिसरातील कॅब ड्रायव्हरला कोरोना झाला होता.
पनवेलमधील आणखी एका ओला कॅब चालकाला कोरोनाची लागण
संबधित ओला कॅब ड्रायव्हर हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई व पनवेल परिसरात प्रवासी ने-आण करत होता. सद्यस्थितीत पनवेल तालुक्यात एकूण कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या 29 इतकी झाली आहे.
पनवेलमधील आणखी एका ओला कॅब चालकाला कोरोनाची लागण
संबधित ओला कॅब ड्रायव्हर हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई व पनवेल परिसरात प्रवासी ने-आण करत होता. सद्यस्थितीत पनवेल तालुक्यात एकूण कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या 29 इतकी झाली आहे. खारघरमध्ये 7 कळंबोलीत 1, कळंबोली सी आय एस एफ कॉलनीत 11, कामोठयात 3 , पनवेल शहर परिसरात1, पनवेल ग्रामीण भाग उलव्यात 4 व उरण परिसरात 2 असे मिळून पनवेल तालुका क्षेत्रात एकूण 29 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.