ठाणे -अल्लाहने सोच के रखा था २०११में के २०१९मे कोव्हिड आएगा, इसलिए २०११मे कब्रस्तान को सँक्शन मिला, असे वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मुंब्र्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुंब्र्यातील दफनभूमीच्या कार्यक्रमात आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य? - mumbra cemetery news
मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना शेख यांनी दफनभूमी उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात आव्हाड बोलत होते.
jitendra-awhad
प्रलंबित होता विषय
मुंब्र्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना शेख यांनी दफनभूमी उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात आव्हाड बोलत होते. मागील अनेक वर्षांपासून या दफनभूमीचा विषय प्रलंबित होता. यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. अखेर याची पूर्तता झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन काल (१९ फेब्रु.) होते. त्यातच त्यांनी हे वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.