ठाणे - घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. या आपघातात ३ वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री सव्वा ११च्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे घडली.
घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनरने दोघांना चिरडले - ठाणे बातमी
घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनरने दोघाना चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरूवारी रात्री ११च्या सुमारास घोडबंदर रोडवर भाईदर पाडा येथे घडली.
घोडबंदर रोडवर अपघात
भाईंदर पाडा येथून ही महिला आपल्या पती सोबत दुचाकीवरून जात होती. याचवेळी मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. यावेळी दुचाकीवरील महिलेचा तोल जाऊन ती खाली पडल्यामुळे भरधाव कंटेनरने संबधीत महिलेसह चिमुरडीला चिरडले. या अपघातात महिलेसह चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून महिलेचा पती वाचला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वडवली पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.