ठाणे -महापालिका क्षेत्रात कोविड काळात अनधिकृत बांधकामानी डोके वर काढले असून येत्या दिवसात ठाणे भारतीय काँग्रेस अनधिकृत बांधकाम विरोधात एल्गार पुकारणार आहे. ठाणे महापलिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांला दर महिन्याला 3 करोडचा हप्ता शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामाचा मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून ठाणे महापलिकेतला तो अधिकारी कोण? याची सीआयडी चौकशी मागणी देखील काँग्रेस नगरसेवक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषदेत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ता गिरीष कोळी व सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या उपस्थित होते.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने या बाधकामा विरोधात आणि बांधकामांना अभय देणाऱ्या सर्वच घटकां विरोधात ठाणे काँग्रेस एल्गार पुकारणार आहे. याची मंगळवार पासून सुरूवात होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी दिली. खरेतर नवीन आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, काही अधिकारी व बांधकाम माफीयाच्या संगमताने हि बाधकामे सुरूच आहेत. अनधिकृत बांधकाम व फेरिवाल्याकडून काही अधिकाऱ्यांना 3 करोड रूपयाचा हप्त्या पोहचत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला असून याच्या सी.आय्.डी.चौकशीची मागणीही केली आहे.