महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रुग्णाच्या नावात गोंधळामुळे प्लाज्माची आदला-बदल - मीरा भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागा बद्दल बातमी

रुग्णाच्या नावात गोंधळामुळे चक्क प्लाज्माची आदला-बदल झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तेजश्री सोनावणे यांनी दिली आहे.

Confusion in patient names has led to a change in plasma
रुग्णाच्या नावात गोंधळामुळे चक्क प्लाज्माची आदला-बदल

By

Published : Apr 7, 2021, 10:01 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पश्चिमेला असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात बाधित रुग्णाला प्लाज्मा न देता बिगर कोविड रुग्णाला प्लाज्मा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दोन्ही रुग्णाचा जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

रुग्णाच्या नावात गोंधळामुळे प्लाज्माची आदला-बदल

भाईंदर पश्विम परीसरातील महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात ३० मार्चला तुलसीराम पांड्या या ४८ वर्षीय व्याक्तीला करोनाची बाधा झाल्याने उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची परिस्थिती दिवसंदिवस खालावत असल्यामुळे ५ एप्रिलसा प्रथम या रुग्णाला प्लाज्मा चढवण्यात आला. मात्र, तरी देखील परिस्थितीत सुधार होत नसल्यामुळे पुन्हा ६ एप्रिलला प्लाज्माची आवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली. त्यानुसार रुग्णाच्या भावाने ४० हजार रुपये खर्च करून प्लाज्माचा बंदोबस्त करून रुग्णालयाला सुपूर्द केला. मात्र, याच वेळी ६ एप्रिलला रुग्णालयात तुलसीदास नावाचे दुसरे रुग्ण दाखल झाले. या रुग्णाचा अद्यापही करोना अहवाल प्रलंबित असताना यांना 'तुलसीदास' यांना 'तुलसीराम' समजून प्लाज्मा चढवण्यात आला. धक्का दायक बाब म्हणजे केवळ नावाच्या गोंधळामुळे दोन रुग्णांचा जीव धोक्यात आल्याने त्यांच्या कुटूंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णाला काही झाल्यास जबाबदार कोण ?

माझ्या भावाला तात्काळ प्लाज्माची अवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. आता या गोंधळामुळे १२ तासापासून त्याला प्लाज्मा देण्यात आलेला नाही. आता रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया रुग्ण तुलसीरामाचा भाऊ रोहित पांड्या यांनी दिली आहे. ही घटना समोर आली असून मला यांची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तेजश्री सोनावणे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details