ठाणे : नवरात्रोत्सव गरबा रास दांडियामुळे रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या या नृत्याच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जोडपी जमतात. तरुण आणि तरुणीची मोठी गर्दी या उत्सवाला असते, यामुळेच रात्री उशिरा पर्यंत घराच्या बाहेर पडलेल्या तरुणी आणि तरुण एकत्र गरबा खेळताना शारीरिक आकर्षणाचे बळी (Navratri Garba Dandia and Sex ) पडतात. त्यानंतर ९ दिवसाच्या कालावधीत हे जोडपे आपली शारीरिक भूख मिटवण्यासाठी काही तास किंवा अल्पसा काळ हा लॉजिंग (Navratri lodging business booming) आणि हॉटेल्सच्या चार भिंतीत घालवितात. तरुण तरुणीच्या या "रात्रीचा खेळ चाले"साठी कंडोम खरेदी हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असल्याने खरेदी होणारच यात शंका नाही. अन यामुळेच नवरात्र उत्सवात नेहमीपेक्षा सर्वाधिक विक्रमी कंडोमची विक्री (Condom Highest Sale Navratri) होताना दिसते. काही विक्रेते नवरात्रोत्सवाच्या आधीच कंडोमच्या अतिरिक्त स्टॉक आणून ठेवतात. या दरम्यान कंडोमच्या विक्रीत पाचपट वाढ (condom sales five times increase) होत असल्याचे एका फार्मसिस्टने सांगितले. (Navratri 2022)
नवरात्रीत भलत्याच प्रेमाला येतो बहार-नऊ दिवसाच्या कालावधीत नव्या आणि प्रथमच शारीरिक आकर्षण पूर्ण करण्यासाठी जाताना कंडोम घेतातच. त्या सोबतच अनेकवर्ष प्रेमप्रकरणात गुंफलेले प्रेमवीर आणि तरुणी हे केवळ संधीची वाट पाहत असतात आणि संधी मिळताच लॉजिंगच्या किंवा हॉटेल्सच्या पायऱ्या चढतात. जुन्या प्रेमवीरांच्या हा लॉजिंग आणि हॉटेलचा एक तासाचा रंगारंग कार्यक्रम ९ दिवस फार्मात असतो. गरब्यासाठी जमणे, संधी मिळताच इतर मित्रमंडळी सोडून गुपचूप निघणे आणि गरबा संपण्यापूर्वीच गरबा नृत्यात सामील होतात. यातील काही जोडपे त्यांच्या कुकृत्यावर पांघरून घालण्यासाठी विविध बहाण्यांचा आधार घेतात. नवरात्रीत केवळ तरुण तरुणीचं नाही तर जुने प्रेमवीर, विवाह होऊन गेलेल्या आणि नवरात्रीसाठी माहेरला आलेल्या मुली अशा संधी सोडत नाहीत. तर त्यापेक्षाही प्रस्थापित कुटुंब संसार असतानाही दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या महिला आणि पुरुषही याच संधीचा पुरेपूर फायदा घेतात. म्हणूनच कंडोमची विक्रमी होते याला या गोष्टी आणि कार्यपद्धती कारणीभूत ठरते.