महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fraudulent woman arrested Thane : अदृश्य आत्म्याची भीती दाखवून पंधरा लाखांच्यावर गंडा घालणाऱ्या भोंदू मांत्रिक महिलेला अटक - Fraudulent sorceress arrested in Thane

अदृश्य आत्म्याची भीती दाखवून showing fear of invisible spirits तुमचा त्या आत्म्यामुळे मृत्यू होईल; त्यामुळे तुम्हाला तंत्रमंत्र, धार्मिक पूजापाठसह लोकांना जेवण घालण्यासाठी आणि इतर खर्च लागेल, अशी थाप देत या भोंदू मांत्रिक महिलेने त्या व्यक्तीला १५ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा गंडा Financial fraud by a fraudulent magician घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका भोंदू मांत्रिक महिलेला अटक Fraudulent Sorceress Arrest Thane केली आहे.

भोंदू मांत्रिक महिलेला अटक
भोंदू मांत्रिक महिलेला अटक

By

Published : Sep 15, 2022, 8:13 PM IST

ठाणे : ७९ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला अदृश्य आत्म्याची भीती दाखवून showing fear of invisible spirits तुमचा त्या आत्म्यामुळे मृत्यू होईल; त्यामुळे तुम्हाला तंत्रमंत्र, धार्मिक पूजापाठसह लोकांना जेवण घालण्यासाठी आणि इतर खर्च लागेल, अशी थाप देत या भोंदू मांत्रिक महिलेने त्या व्यक्तीला १५ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा गंडा Financial fraud by a fraudulent magician घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police Station विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका भोंदू मांत्रिक महिलेला अटक Fraudulent Sorceress Arrest Thane केली आहे. मात्र तिची दुसरी साथीदार फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. प्रिया उर्फ त्रिशा कुणाल केळुसकर (वय २६, रा. खोणी गाव डोंबिवली ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.


अदृश्य आत्म्यापासून तुमची सुटका करेल..डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटीत वसंत गंगाराम समर्थ, (वय ७९ वर्षे) हे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले आहे. तर त्यांचा मुलगा कॅनडा देशात नोकरीनिमित्त स्थायिक झालेला आहे. वसंत समर्थ हे एकटे राहत असल्याने आरोपी प्रिया उर्फ त्रिशाला हिला घरकाम करण्यासाठी मोलकरीण म्हणून ठेवले होते. आरोपी प्रियाला मांत्रिक असलेली तिची मैत्रीण आहे. २६ जुलै २०२२ रोजी वसंत यांना तुमच्या घरात कोणीतरी करणी केली आहे. तसेच अदृश्य आत्म्याची भीती दाखवून तुमचा त्या आत्म्यामुळे मृत्यू होईल. त्यामुळे तुम्हाला तंत्रमंत्र धार्मिक पूजापाठ करावी लागेल. अशी थाप मारून माझी ओळखीची मांत्रिक महिला असून ती सर्वच तंत्रमंत्र धार्मिक पूजापाठ करून अदृश्य आत्म्यापासून तुमची सुटका करेल असे सांगितले. यावर वसंत यांनी विश्वास ठेवून त्या मांत्रिक भोंदू महिलेला घरी बोलावले.


१५,लाख ८७, हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त -त्यानंतर २६ जुलै ते १३ सप्टेंबर २०२२ पर्यंत अदृश्य आत्म्याची भीती दाखवून या दोन्ही आरोपींनी वेळोवेळी तंत्रमंत्र पूजापाठ व जादूटोणा करत वसंत यांच्याकडून पूजेच्या नावाने लाखो रक्कमसह दागिने, कार , म्युझीक सिस्टीम, असा १५ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या होत्या. दुसरीकडे आपली फसवणूक झाल्याचे समजताच वसंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०६ ,३४,सह महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा, जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सपोनि सुर्यवंशी व त्यांच्या पथकाने आरोपी प्रिया उर्फ त्रिशा हिचा शोध घेवुन तिला खोणी गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देत, तिच्या घरातून कार दागिने आणि रोकड असा १५,लाख ८७, हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठाण्यात भोंदू मांत्रिकाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य सोबत प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी


फरार मांत्रिक भोंदू महिलेचा शोध सुरू -गुन्ह्यातील फरार मांत्रिक भोंदू महिला मरियम उर्फ सेहनाह शेख हिचा शोध सुरु असून या दोघांनी आणखी कोणाची करणी जादूटोणाच्या नावाने फसवणूक केली आहे. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त, सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details