महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2022, 4:01 PM IST

ETV Bharat / city

Thane Murder  झोपेच्या जागेवरून सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

झोपेच्या जागेवरून दोघा सहकार्यांमध्ये झालेल्या वादात colleague dispute एका सहकाऱ्याने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची colleague murder Thane धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील न्हावीपाडा भागातील colleague killing in Bhivandi वफा सायझिंग कंपनीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लोखोर सहकाऱ्याला अटक करण्यात accused arrested colleague murderer आली आहे.

colleague killed by stone
सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

ठाणे झोपेच्या जागेवरून दोघा सहकार्यांमध्ये झालेल्या वादात colleague dispute एका सहकाऱ्याने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची colleague murder Thane धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील न्हावीपाडा भागातील colleague killing in Bhivandi वफा सायझिंग कंपनीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लोखोर सहकाऱ्याला अटक करण्यात accused arrested colleague murderer आली आहे. शेरबहादूर सिंग वय ३३ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर इकबाल अहमद मोहंमद शकिब अन्सारी वय ६५ वर्षे असे हत्या झालेल्या सहकाऱ्याचे नाव आहे. Thane Crime


दगडाने ठेचून जागीच ठार मारलेमृतक इकबाल आणि आरोपी शेरबहादूर दोघेही भिवंडीतील न्हावीपाडा भागातील वफा सायझिंग कंपनीत काम करून कंपनीतच एका खोलीत राहत होते. त्यातच मृतक इकबालला दारु व गांजा पिण्याचे व्यसन होते. आरोपीचा मोबाईल आणि घड्याळ मृत इकबालने चोरल्याचा संशय होता. त्यामुळे आरोपीला मृतक सतत शिविगाळ करत होता. शिवाय कंपनीत एकच खोलीत झोपत असल्याने त्यांचा झोपेच्या जागेवरूनही वाद होत असे. असाच वाद दोघांमध्ये ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास झाला होता. त्यावेळी आरोपी शेरबहादूरने इकबालचा काटा काढण्याचा बेत आखून मध्यरात्रीच्या सुमारास इकबाल झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून जागीच ठार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

शांतीनगर पोलीस स्टेशन, ठाणे


बंद लूम कारखान्यात लपून बसला होता आरोपीदुसरीकडे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पोलीस बंदोबस्तात असतानाच दुपारच्या सुमारास हत्येची घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या दरम्यान कंपनीतील शेरबहादूर नावाचा कामगार बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजल्याने त्याच्यावर हत्येचा संशय बळावला होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मोबाईल वापरत नसल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीच्या भिवंडीतील नातेवाईकांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. गुप्त बातमीदाराने पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव यांना माहिती दिली की, आरोपी हा जब्बर कंपाऊंड परिसरात असलेल्या एका बंद लूम कारखान्यात लपून बसला आहे.


आरोपीने दिली हत्येची कबुलीगुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बंद लूम कारखान्यात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने इकबलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची पोलिसांना कबूली दिली. काल शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा loot attempt in Malegaon failed मालेगावात स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने लुटीचा प्रयत्न फसला

ABOUT THE AUTHOR

...view details