महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आटगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डब्बा घसरला, वाहतूक ठप्प - लोकल रेल्वेचा डबा घसरला

अत्यावश्यक सेवेत धावणारी लोकल आसनगावहून आटगावच्या दिशेने जात असताना या लोकलचे डबे रुळावरून घसरले. दरम्यान, रिलिफ ट्रेनला पाचारण करण्यात आले असून, नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

local train derailed
रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डब्बा घसरला

By

Published : Sep 19, 2020, 10:44 AM IST

ठाणे- मुबंईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचा डब्बा आटगाव रेल्वे स्थानका नजीक रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत कुठलीही हानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र, रेल्वेचा डबा घसरल्याने या लोहमार्गावरील अत्यावश्यक रेल्वे सेवेची वाहतूक ठप्प झाली आहे.

शनिवारी सकाळच्या सुमाराला एक अत्यावश्यक सेवेत धावणारी लोकल आसनगावहून आटगावच्या दिशेने जात असताना या लोकलचे डबे रुळावरून घसरले. दरम्यान, रिलिफ ट्रेनला पाचारण करण्यात आले असून, नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच कसारा-कल्याण अप मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कुठलाही परिणाम झालेला नाही. तर केवळ आटगाव कसारा या डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अनलॉक होऊ लागला आहे. त्यात मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र सध्या ती अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सेवा देत आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने वकिलांनाही प्रवासाची परवानगी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details