महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जनतेचे हित हाच आमच्या सरकारचा एकमेव अजेंडा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त

माथाडी नेते नरेंद्र पाटील ( Under Mathadi Leader Narendra Patil on Behalf ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य माथाडी, वाहतूक व सामान्य कामगार युनियनच्या वतीने माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती ( Annasaheb Patil 89th Birth Anniversary ) व भव्य माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन ( Grand Mathadi Workers Meeting was Organized ) करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ( CM and Deputy CM were Present ) उपस्थित होते.

CM and Deputy CM Present in Organizing a Grand Mathadi Workers Meeting
भव्य माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

By

Published : Sep 25, 2022, 2:25 PM IST

नवी मुंबई : माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य माथाडी, वाहतूक व सामान्य कामगार ( Mathadi Leader Narendra Patil on Behalf ) युनियनच्या वतीने माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंती ( Annasaheb Patil 89th Birth Anniversary ) व भव्य माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात ( Grand Mathadi Workers Meeting was Organized ) आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

भव्य माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती


आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे :अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरील नरेंद्र पाटील यांची पात्रता लक्षात घेऊन नियुक्तीला मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. "आमच्या सरकारचा कोणताही पर्सनल अजेंडा" नाही, जनतेचे हित हाच आमच्या सरकारचा एकमेव अजेंडा असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कायदा बदलण्याची गरज भासल्यास कायदा बदलून माथाडी कामगारांना न्याय देऊ, असेही शिंदे यांनी म्हटले.

नवी मुंबईच्या विकासाला पूर्ण पाठिंबा :गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे करीत असलेल्या नवी मुंबईच्या विकासाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असेही शिंदे यांनी म्हटले. माथाडी कामगार मंडळातील गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. जर कोणी तसे करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी म्हटले. जो निर्णय अगोदरच्या सरकारने अडीच वर्षांपूर्वी घेतला नाही, तो निर्णय आमचे सरकार घेईल आणि माथाडी कामगारांना न्याय देईल, असेही शिंदे यांनी म्हटले.

काम न करता माथाडी कामगारांच्या नावे वसुली करणाऱ्यांवर करणार कारवाई : देवेंद्र फडणवीस
माथाडी कामगारांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यात येतील, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील यांच्याकडे देण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. साडेतीन वर्षांत १५ हजारापेक्षा अधिक लोकांना रोजगार देऊ शकतो, असेही फडणवीस यांनी म्हटले. आमचे सरकार विनंती करणारे आणि पत्रव्यवहार करणारे सरकार नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सरकार आहे. त्याचबरोबर माथाडींचा मुखवटा घालून, माथाडींच्या नावावर ‘काम’ न करता ‘वसुली’ करणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाणार असेही फडणवीस यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details