महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Naresh Maske : मुख्यमंत्री शिंदेंकडून नरेश मस्के यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी पुनश्च नियुक्ती; म्हणाले, 'हकालपट्टी हे शब्द...'

काही दिवसांपूर्वी सामनात नरेश मस्के यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे यांनी नरेश मस्के यांची पुन्हा ठाणे जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली ( Naresh Maske Thane District Chief Shivsena ) आहे.

Naresh Maske
Naresh Maske

By

Published : Jul 15, 2022, 3:38 PM IST

ठाणे - शिवसेना भवनच्या एसी कॅबिनमधून हकालपट्टी करणं सोपं असतं. मात्र, रस्त्यावर उतरून पक्षासाठी आयुष्यभर काम करणं लोकांच्या शिव्या खात प्रसंगी मारहाण सहन करत पक्ष वाढवणे हे खूप मोठं असते, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नवनियुक्त जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी ( Naresh Maske Thane District Chief Shivsena ) दिली. ते 'ईटिव्ही भारत'शी बोलत होते.

नरेश मस्के यांनी पुन्हा नियुक्ती -शिवसेनेच्या आमदारांनी आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर नरेश मस्के यांनी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच, संपूर्ण रणनीतीमध्ये मोलाचा हातभार देखील लावला, ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून त्यांची हकापट्टी करण्यात आली. सामनामध्ये याबाबतचे वृत्त झळकले. मात्र, गुरुवारी ( 14 जुलै ) नरेश मस्के यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुख पदाची सुत्र पुन्हा मस्के यांच्या हाती सोपवण्यात आली. तसेच, आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही तेव्हा घेण्यात आला.

नरेश मस्के यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

'पक्षाकडून अशी वागणूक ही खेद...'यासंदर्भात बोलताना नरेश मस्के म्हणाले की, सामनातून वृत्त झळकण्याच्या आदल्या दिवशीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ज्या पक्षासाठी राज्यभर जिल्हाभर फिरून पक्ष वाढवला, भिंती रंगवल्या, निवडणुकांमध्ये काम केलं, त्या पक्षाकडून अशी वागणूक मिळणे ही खेद जनक बाब आहे. शिवसेना या चार शब्दांवरती आयुष्यभर प्रेम केलं आणि यापुढे देखील करू. आतापर्यंत आपण केलेल्या कामाचा कोणतीही दखल न घेता सामनामधून हकालपट्टी केलेले वृत्त प्रसिद्ध झाले, अशी खंतही मस्के यांनी व्यक्त केली.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट वाद पुन्हा ऐरणीवर -एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नियुक्तीमुळे शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा 'सामना' होण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून झालेल्या नियुक्ती या शिवसेनेला अडचणीत आणणाऱ्या आहेत. यामुळेच पुन्हा एकदा हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. या सुरू झालेल्या नियुक्त्या पुन्हा अशा रीतीने सुरू राहणार असल्याचे नरेश मस्के यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details