ठाणे :याकूब मेनन ( Yakub Menons ) हा बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. त्याला फाशी दिलेली आहे. त्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही पोलिस आणि मुंबई ( Municipal Corporation of Mumbai )महापालिकेला आदेश दिले आहेत. गृह विभाग योग्य ती कारवाई करत आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी ठाण्यात दिली. काल अनेक बैठका झाल्या त्यात सिनेकलाकार आणि कर्मचारी देखील आले होते हे सरकार तात्काळ निर्णय घेणारे सरकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यातील टेम्भी नाका येथे आनंददिघे यांनी सुरूवात केलेल्या नवरात्री उत्सवाचे देवीच्या पाठ पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. दर वर्षी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते ही पुजा होत असते. यावेळी या कार्यक्रमाला शिंदे गटासोबत उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे केदार दिघे हे देखील उपस्थित होते. यंदाचा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा करणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.