ठाणे -मोरुची मावशी या नाटकातील आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा ( Cluster Beans) . या गाण्याने रसिकांची मने जिंकली होती. मात्र शेंगा पार महागाईच्या झाडावर पोहचल्यामुळे स्वयंपाक घरात गृहिणींच्या डोळयात पाणी आणले आहे.इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे ,त्यात शेवग्याच्या शेंगाची किंमत तर ४०० रुपये किलो तर मटार २०० रुपये किलो झाले आहेत.
Vegetables price hike : चिकनपेक्षा शेवग्याच्या शेंगा महाग; किलोला 400 रुपयांचा भाव - etv bharat
आमटी, डाळ, सांबाराची चव वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा ( Cluster Beans) बाजारात ३८० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. आजच्या घडीला सर्वात महागडी भाजी म्हणून शेवग्याची शेंग भाव खात असल्याने जेवणाच्या ताटातून ती हद्दपार होऊ लागली आहे.
शेवग्याच्या शेंगा महाग
चिकनपेक्षा ही शेवग्याच्या शेंगा महाग झाल्यात. त्यामुळे आम्ही पहिले हफ्त्याभराच्या भाज्या विकत घेत होतो ,परंतु आता मात्र फक्त १ ते २ दिवसाच्या भाज्याच घेतो. ते ही पाव किलो ते अर्धा किलो असे ग्राहक सांगत आहेत. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे भाजी विक्रेतेही यामुळे चिंतेत आहेत , अश्या महागड्या भाज्यांच्या खरेदीत ग्राहकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे.