ठाणे -वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला भारत बंदचा परिणाम फारसा दिसून येत नाही आहे. मात्र, ठाण्यात वंचित बहुजन आघीडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला होता. त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामुळे काही काळ तीन हात नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती.
ठाणे : 'वंचित'चा बंद, काही ठिकाणी आंदोलन वगळता जनजीवन सुरळित - Maharashtra closed agitation
वंचित बहुजन आघाडीने बंद पुकारला आहे. ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
CCA, NRC व केंद्र सरकारचे आर्थिक धोरण यामुळे व्यापार संपला ,बेरोजगारी वाढली असे सांगत या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील तीन हात नाका येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तीन हात नाका येथे जमलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला आणि तीन हात नाका चौकात येताच कार्यकर्ते रस्त्यावर झोपले आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तीन हात नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, रास्ता रोको करताच ठाणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले त्यामुळे तीन हात नाका येथील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दुसरीकडे रिपब्लिकन नेते सुनील खाम्बे यांनी ठाण्यात एकटेच फिरत बंद करण्याचे आवाहन केले त्यांनी खोपट सिग्नल येथे एसटी आडवून आपला निषेध नोंदवला