ठाणे -जर आपल्याला यश मिळावायचं असेल तर त्यासाठी कठीण परिश्रम आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. असेच उदाहरण ठाण्यातील एका विद्यार्थिनीचे आहे. सध्या स्पर्धेचे युग सुरू आहे. अश्यातच तरुणाईच्या मनात घर करणार साधन म्हणजे सोशल मीडिया. सर्वच मुले सोशल मीडिया च्या नादाने गुंतून गेले आहेत. मात्र सोशल मीडिया त्याग कोणालाही जमणार नाही. सर्वच ठिकाणी मुले ऑनलाईन शिक्षण मुळे मोबाईल सोबत जोडले गेले आहेत. परीक्षा देखील ऑनलाईन होत आहेत मात्र सी बी एस ई च्या परीक्षा (CBSE Exam ) ऑफलाईन होऊन देखील अनेक मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे.असेच घवघवीत यश मिळवले आहे ठाण्यातल्या मुग्धा शिंदे ( Mugdha Shinde ) या विद्यार्थिनीने, मोबाईल ची साथ सोडून सर्व मोहाना न भुलता या विद्यार्थिनीने परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
Exam Success : मोबाईलची सोडली साथ; सी बी एस ई परीक्षेत घवघवीत यश
आपल्याला यश मिळावायचं असेल तर त्यासाठी कठीण परिश्रम आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही.असेच ठाण्यातल्या डीएव्ही शाळेमध्ये ( DAV School Thane ) शिकणाऱ्या मुग्धाने मोबाईलला दूर ठेवून सीबीएससी (CBSE Exam Success ) परीक्षेमध्ये 96 टक्के मार्क मिळवले आहेत.
सोशल मीडियामुळे होतो टाईमपास -परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या मुग्ध हिने सोशल मीडियापासूनही स्वतःला दूर ठेवल आहे.यामध्ये फक्त वेळ खर्चिक होतो आणि त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही असं मत तिनी व्यक्त केले. ठाण्यातल्या डीएव्ही शाळेमध्ये शिकणाऱ्या मुग्धा येणे सोशल मीडिया आणि मोबाईलला दूर ठेवून सीबीएससी परीक्षेमध्ये 96 टक्के मार्क मिळवले आहेत. हे मार्क मिळवताना तिला तिच्या आई-वडिलांची मदत मिळालीच पण तिने केलेली मेहनत ही खूप जास्त असल्याचे तिचे आई-वडील अभिमानाने सांगत आहेत. मुग्धाच्या या यशामुळे आई-वडील दोघेही आनंदित झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही मुलींना अशाच पद्धतीचा यश मिळाले होते. ज्यात दुसऱ्या मुलीला या परीक्षेत 97.6 टक्के मिळाले आहेत.