ठाणे - गोदामातून दुचाकीने कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर एका चौकडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पुनवेश केशव थोरात ( ३३ रा.अंबाडी, पंचशील नगर) असे चॉपर हल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
क्षुल्लक वादातून तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला - Fatal attack on youth in Thane
गोदामातून दुचाकीने कामावरून घरी परणाऱ्या तरुणावर एका चौकडीने प्राणघातक हल्ला कल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गावडे अधिक तपास करत आहेत .
पुनवेश हा रोजच्या प्रमाणे भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे सोमवारी रात्री पावणेदहा वाजता पडघा येथील गोदामाच्या कामावरून दुचाकीने घरी येत होता. त्यावेळी अंबाडी मच्छी मार्केट जवळ उभ्या असलेल्या चौकडीने त्याला आवाज दिला. त्यामुळे त्याने दुचाकी वळवून आवाज दिल्याचा जाब विचारला. त्यावरून चिडलेल्या टोळक्यातील महेश चंद्रकांत पाटील ( २४ रा.पालखणे ), शुभम पालवी ( २२ रा.दलोंडे ) व त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी तुला आवाज दिल्याबरोबर तू लगेच फिरून आला. तू काय भाई आहेस काय? असा सवाल केला. त्यावर पुनवेश याने मी कशाला भाई होऊ असे उत्तर दिले. त्या मुळे चौकडीचा अधिकच जळफळाट होऊन त्यांनी पुनवेश थोरात याला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या चौकडीतील एकाने धारदार चॉपरने उजवा हात, डोके व पाठीवर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या पुनवेश याला आजुबाजूच्या नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने अधिक उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्राणघातक हल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात हल्लेखोर महेश पाटील, शुभम पालवी व त्याचे आणखीन दोन साथीदार अशा चौघांच्या विरोधात भाकतीय सविधान कलम ३०७ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील महेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. शुभम याच्या हाताला देखील दुखापत झाल्याने त्याला अंबाडी नाका येथील जिजाऊ धर्मादाय रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली उपचारासाठी दाखल केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गावडे करत आहे.