ठाणे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपलेल्या एका अडीच वर्षीय चिमुरड्याचे अपहरण child kidnapped from Kalyan Railway station केल्याची खळबळजनक घटना समोर आली. मात्र कल्याण लोहमार्ग पोलिसांनी Kalyan railway police arrested child kidnappers घटनेचे गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरण करणाऱ्या बंटी बबलीच्या जोडीला सहा तासांतच बेड्या ठोकल्या child kidnapping couple arrested within six hours आहेत. पूजा मुंडे आणि अमित शिंदे असे आरोपी बंटी बबलीची नावे आहेत. Kalyan railway station child kidnapping news
चिमुरडा एकटा झोपल्याचे पाहून अपहरणकल्याण रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने २४ तास प्रवाशांची ये जा असते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर संजू राजवंशी ही महिला तिच्या अडीच वर्षांच्या मुलाला सोडून वडापाव घेण्यासाठी कॅन्टीनच्या दिशेने गेली होती. मात्र पुन्हा परत आली तेव्हा त्याठिकाणी तिचा अडीच वर्षांचा मुलगा अक्षय त्याठिकाणी नव्हता. त्यामुळे तिने मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा न सापडल्याने तिने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन मुलाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चिमुरड्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चिमुरड्याला एक व्यक्ती व महिला चिमुरडयाला झोपेतून उचलून कडेवर घेऊन जाताना दिसून आले.