ठाणे - एकीकडे धनुष्यबाण कोणाला मिळणार अशी सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, असे असताना आता पक्षाच्या कार्यकारिणीची प्रक्रिया उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या गटाकडून सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी वाढदिवसाला सर्वांकडून प्रतिज्ञापत्र भेट म्हणून मागवले होते, त्याला अनेक शिवसैनिकांनी प्रतिसाद देखील दिला होता. तर, त्याला टक्कर देत ठाण्यात देखील शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र ( Support to Eknath Shinde ) आज भरून देत आहेत.
लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञा पत्र महत्त्वाचे -ठाण्यातील शिवसेनेचे कार्यालय असलेल्या आनंद दिघे ( Anand Dighe ) यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत. यात ठाणे महापालिकेतील ( Thane Municipal Corporation ) सर्व नगरसेवक, पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत. ते आपला अर्ज भरून एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे दाखवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी, न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञा पत्र महत्त्वाचे मानले जात आहे.