महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक; कळवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा, स्वॅब टेस्टिंगच्या ठिकाणीच टाकले मृतदेह

By

Published : May 28, 2020, 8:15 PM IST

Updated : May 28, 2020, 9:51 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कमी पैशामध्ये कोविड टेस्ट केली जात असल्याने मोठ्या संख्येने लोक चाचणीसाठी जात असतात. मात्र, ज्या ठिकाणी ही चाचणी करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चक्क दोन अज्ञात मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

Body
स्वॅब टेस्टींगच्या ठिकाणीच टाकलेले मृतदेह

ठाणे- कोरोनाबाधितांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कोरोनाच्या संक्रमणाला कारणीभूत ठरले होते. आता पुन्हा याच रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोविडच्या तपासणी करण्यात येणाऱ्या ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक; कळवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा, स्वॅब टेस्टिंगच्या ठिकाणीच टाकले मृतदेह

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या कोविड आणि नॉन-कोविड अशा प्रकारात समाविष्ट करण्यात आलेले आहे. या ठिकाणी कमी पैशामध्ये कोविड टेस्ट केली जात असल्याने मोठ्या संख्येने लोक चाचणीसाठी जात असतात. मात्र, ज्या ठिकाणी ही चाचणी करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चक्क दोन अज्ञात मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या दोनपैकी एक मृतदेह हा स्टे्रेचरवर निळ्या प्लास्टीकमध्ये बांधून ठेवण्यात आला असून दुसरा मृतदेह पांढर्‍या कापडात बांधून चक्क लादीवरच ठेवल्याचे सदर व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

एकीकडे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही संहिता आखून दिलेली असताना हे दोन मृतदेह असे उघड्यावर टाकण्याचा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने हे मृतदेह अज्ञात असून त्यांना कोरोना नसल्याचे सांगितले जात आहे. तरी मृत्यूनंतर अनेकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे.

Last Updated : May 28, 2020, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details