महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुंपणच खाते शेत... गांजाची तस्कर करणारा निघाला पोलीस कर्मचारी; छत्तीसगड पोलिसांची कारवाई - गांजाची तस्कर करणारा निघाला पोलीस कर्मचारी

ओडिसा सीमेवरून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. बस्तार जिल्ह्यातील नगरनार पोलिसांनी ( Nagarnar Police action in Ganja Smuggling ) सीमेवरील धनपुंजी नाक्यावर संशयीत गाडी अडविली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस खात्यात कार्यरत असलेला साजिद पठाण या पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश ( police arrest in Ganja smuggling case ) असल्याचे समोर आले आहे.

गांजा तस्करी
गांजा तस्करी

By

Published : Feb 12, 2022, 10:06 PM IST

मीरा भाईंदर ( ठाणे ) - छत्तीसगड पोलिसांनी गांजाची तस्कर करणार्‍या ( Ganja smuggling case ) सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याच ( Chattisgarh police arrest police ) निष्पन्न झाले आहे. साजिद पठाण असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ओडिसा सीमेवरून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. बस्तार जिल्ह्यातील नगरनार पोलिसांनी ( Nagarnar Police action in Ganja Smuggling ) सीमेवरील धनपुंजी नाक्यावर संशयीत गाडी अडविली. तपासणी असता त्या गाडीमध्ये १६ गांजाच्या गोण्या आढळून आल्या आहेत. गाडीसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. मुंबई, ठाणे, वसई, नालासोपारा या परिसरात गांजाची विक्री करत असल्याच समोर आले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पोलीस खात्यात कार्यरत असलेला साजिद पठाण या पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश ( police arrest in Ganja smuggling case ) असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा-Suicide In Aurangabad : एकमेकांना घट्ट मिठी मारत विष प्राशन करून दीर- भावजयची आत्महत्या

जप्त केलेल्या १६ गोण्यांमध्ये एकूण १५० किलो गांजा आहे. बाजारभावाप्रमाणे चार लाख रुपये इतकी किमत आहे. पोलिसांनी पोलिस कर्मचारी साजिद पठाणसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांचा मोबाइल व गाडी जप्त केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा मुख्य सुत्रधार कोण यांचा तपास छत्तीसगड पोलीस करत आहेत. त्यांच दिवशी नालासोपारामध्ये राहणार्‍या दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देखील ७० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details