महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 23, 2021, 8:20 PM IST

Updated : Dec 24, 2021, 4:33 PM IST

ETV Bharat / city

Thane Municipal Corporation : विविध मागण्यांसाठी चर्मकारांचे पालिकेसमोर आंदोलन

गटई व्यवसाय करणाऱ्या चर्मकारांच्या स्टाॅलवर ठाणे महापालिका वारंवार कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ( Thane Municipal Corporation ) चूल-मूल आंदोलन करण्यात आले. मागण्या ( Leatherworker Agitation Thane Corporation ) मान्य न झाल्यास विधानभवानावर ( Maharashtra Legislative Assembly 2021 ) मोर्चा काढू, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

आंदोलक
आंदोलक

ठाणे -गटई व्यवसाय करणाऱ्या चर्मकारांच्या स्टाॅलवर ठाणे महापालिका वारंवार कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर ( Thane Municipal Corporation ) चूल-मूल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो चर्मकार आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच चूल मांडून आपले अन्न शिजवले.

आंदोलक

ठाणे शहरात अनेक ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने गटई स्टॉलला मान्यता दिली आहे. त्याच अनुषंगाने गोरगरीब चर्मकार रस्त्यावर कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही, या पद्धतीने आपला गटई व्यवसाय करत आहेत. मात्र, दि. 8 डिसेंबरपासून नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, माजीवडा-मानपाडा, कळवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे.

ठाणे शहरात अनेक स्टॉल ठाणे महानगर पालिकेने प्रमाणित केले आहेत. तर, अनेक स्टॉल्स हे राज्य शासनाच्या साामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेले आहेत. त्यानंतरही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे हा विषय निदर्शनात आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याशी सोमवारी ( दि. 20) चर्चाही करण्यात आली. मात्र, चर्चेत तोडगा न निघाल्याने चर्मकार समाजातील अनेक जण ठाणे महापालिकेसमोर ठाण मांडून बसले. या ठिकाणी आंदोलकांनी चूल पेटवून अन्न शिजवले.

...अन्यथा विधानभवनावर मोर्चा
प्रशानसनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर शनिवारी ( दि. 25 ) ठाणे ते मुंबई विधानभवन ( Vidhan Bhawan ), असा लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी राजाभाऊ चव्हाण यांनी दिला.

  • या आहेत मागण्या
  1. ठाणे शहरातील सर्व गटई स्टॉलवरील कारवाई स्थगित करावी.
  2. ठाणे महापालिकेचा परवाना गटई स्टॉलधारकांना पिच परवाना देण्यात यावा.
  3. परवानाधारक गटई स्टॉलच्या परवान्याचे नूतनीकरण करावे.

हे ही वाचा -Thane Crime : पाच वर्षानंतर माय लेकरांची भेट; खांदेश्वर पोलिसांची कारवाई

Last Updated : Dec 24, 2021, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details