ठाणेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री (cm eknath shinde)सरकार चालवतात की फक्त फिरतात असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी (supriya sule) उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, आणि फिरतीलही सुप्रियाताईंनी काळजी करू नये असा टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, आणि फिरतीलही सुप्रीयाताईंनी काळजी करू नये -चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरु आहे. तूम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रिया ताई म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई तुम्ही काळजी करु नका. हे सरकार पण चालवित आहेत आणि फिरतात पण, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या (jeevandeep educational instituite) वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहिर सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासोबत स्कील डेव्हलमेंटवर भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना फंड देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्याथ्र्याची गरज पाहता या भागाला लॉ कॉलेज दिले आहे.
ग्रामीण भागात आर्टस सायन्स, बीएस्सीचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलमेटंची (skill development) जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल तर दुसऱ्या बाजूने त्याला रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त केला. इतकेच नाही तर बीए. बीएस्सी करुन चालणार नाही. हे सामान्य ज्ञान आहे. बीएस्सी सोबत स्कील डेव्हलपमेंट केले पाहिजे. ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढणार. त्याचा फायदा तरुणाना रोजगारासाठी होणार याकडेही मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले आहे.