ठाणे -घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे उड्डाणपुलावरील मोटारीतून खोके पडल्यामुळे मोटारीतील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उड्डाण पूल व ठाणे शहरातील खड्ड्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाघबीळ नाका येथे आज भाजपच्या वतीने खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. भाजप शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
खड्डेमुक्त ठाणे न झाल्यास आगामी काळात भाजपकडून चक्काजाम आंदोलन
ठाण्यात पावसाळ्यात पडलेले खड्डे बुझवण्यासाठी दुर्लक्ष झाले असल्याचे चक्क उद्धव ठाकरे यांनी कबुल केले होते. त्यानंतर प्रशासन कामाला लागेल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात खड्डे अजुनही तसेच आहेत. त्यामुळे भाजपने आज आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचे मृत्यू होत असतानाही टाळूवरील लोणी खाणार्या सरकारला जाग न आल्यास, आगामी काळात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला. ठाण्यात पावसाळ्यात पडलेले खड्डे बुझवण्यासाठी दुर्लक्ष झाले असल्याचे चक्क उद्धव ठाकरे यांनी कबुल केले होते. त्यानंतर प्रशासन कामाला लागेल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात खड्डे अजुनही तसेच आहेत. त्यामुळे भाजपने आज आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
खड्डे असलेले रस्ते
पालिकेचे सर्व्हिस रोड, एमएसआरडीसीचे हायवे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेले रोड या सर्वच ठिकाणी खड्ड्यांचे सम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.