ठाणे गणपतीच्या वर्गणीवरून Thane Ganpati Subscription Dispute मंडळातील पाच जणांनी मिळून केंद्रीय गुप्तवार्ता अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला Central Intelligence Officer beaten unconscious in Thane केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील टेमघर भागातील Central intelligence officer attack केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह govt officer killing attempt Thane विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. विश्वनाथ बाळाराम पाटील वय ३६ वर्षे, प्रतीक विलास बोरसे वय २६ वर्षे, राहुल राधाकिसन राहुलवार वय ३३ वर्षे, सागर पंढरीनाथ पाटील वय २५ वर्षे, जतिश रमेश फुलोरे वय २७ वर्षे अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर सुखसागर कुंदनसिंग रावत वय ३९ वर्षे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
शासकीय कार्यालयातच गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नजखमी रावत हे भिवंडीतील गोपालनगरमध्ये कुटूंबासह राहत असून त्यांचे टेमघर भागातील हरिहरेश्वर सोसायटीमध्ये केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे शासकीय कार्यलय आहे. त्यातच गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेवला आहे. त्यासाठी सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्गणीगोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. अश्याच भिवंडीतील टेमघर भागातील साईश्रद्धा मित्र मंडळ, टेमघर यांच्या मंडळातील कार्यकर्त्यांची वर्गणी गोळा करण्याची धावपळ सुरु असतानाच याच मंडळातील काही कार्यकर्ते १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या शासकीय कार्यालयात जाऊन बळजबरीने रावत यांना गणपती वर्गणीची मागणी केली. मात्र त्यांनी वर्गणी देण्यास नकार देताच पाच आरोपींनी त्यांना कार्यालयातच बेदम मारहाण करत त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते बेशुद्ध झाल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.