महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे ग्लोबल रूग्णालयामध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - thane latest news

ठाणे ग्लोबल रूग्णालयामध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे

By

Published : Apr 23, 2021, 4:03 PM IST

ठाणे - महापालिकेच्या ग्लोबल रूग्णालयामध्ये आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध कलम ४२०, २८६ व ३४प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयु व ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ठाणे ग्लोबल रूग्णालयामध्ये कोरोना रुग्णाच्या प्रवेशासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. खासगी रूग्णालयामध्ये दाखल करून न घेतल्याने ठाणे ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे घेवून रूग्णास दाखल केल्यानंतर समाज माध्यमातून चित्रफीत प्रसारित होताच, महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर महापालिकेच्यावतीने डॉ. अविनाश माळगावकर यांनी गुरूवारी रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.

पाच जणांवर गुन्हा दाखल -

यामध्ये मे. ओमसाई आरोग्य केअर प्रा. लि. येथे 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत असणारे डॉ. परवेझ, श्रीमती नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशा ५ जणांविरुद्ध २३ तारखेला कलम ४२०, २८६ व ३४नुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या रुग्णाच्या झाला मृत्यू -

आईसीयूमध्ये दाखल करण्यासाठी दीड लाखंची मागणी केल्यानंतर ग्लोबल कोविड रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात येत होते. मात्र, त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details