ठाणे - कल्याण येथून भिमाशंकर आंबेगाव येथे ईको कार जात असताना माळशेज घाटात चालकाचा ताबा सुटल्याने कार 80 ते 90 दरीत कोसळली असून कार जळुन खाक झाली आहे. जीव वाचवण्यासाठी कारमधील 5 ते 6 जणांनी गाडी बाहेर उड्या मारल्या. या भीषण अपघातात एक 1 महिलेचा मृत्यू झाला आहे. सखूबाई उगले असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत बोलताना पोलीस अधिकारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात -
कल्याणहुन माळशेज घाट मार्गे आंबेगावकडे रात्रीच्या सुमारास प्रवाशांना घेऊन कार निघाली होती. मात्र, अचानक माळशेज घाटात कारमध्ये आग लागली. त्यामुळे कारमधून प्रवास करणाऱ्यांनी बाहेर उड्या मारल्या. यामुळे ते गंभीर जखमी झाले. तर जळती कार दरीत कोसळली. घटनास्थळी टोकावडे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात रवाना केले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने अंधारात मदत कार्यसाठी अडचणी येत होत्या. तरीही देखील सकाळ पर्यत औरंगाबाद येथील गिरियारोहक पथकाने जखमींना दरीतून बाहेर काढल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.
हेही वाचा -LIVE : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद