Valentine Day With animals : ठाण्यातील तरुणाईने साजरा केला प्राण्यांसोबत अनोखा व्हॅलेंटाईन डे
ठाण्यातील वाघबीळ परिसरात कॅप फाउंडेशन ही सामाजिक संस्था जखमी अवस्थेत आढळणाऱ्या आणि आजरी पडल्याने रस्त्यावर सोडलेल्या मुक्या प्राण्यांसाठी काम करते. त्यासाठी या संस्थेने फ्रीडम फार्म नावाचे निवारा केंद्र देखील उभारले आहे.
Valentine Day With animals
ठाणे :व्हॅलेंटाईन डे म्हटल की अनेक तरुण तरुणी बाहेर फिरायला जातात. एकमेकांना गिफ्ट देतात. मात्र या प्रथेला फाटा देत ठाण्यात काही तरुणांनी मुक्या प्राण्यांसोबत साजरा केला आहे. ठाण्यातील तरुणाईने यंदाचा व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी यंदाचा व्हॅलेंटाईन डे प्राण्यांसोबत साजरा केला.
या कार्यक्रमातून मिळाले समाधान
प्रेमाचा सन्मान आणि प्रेम वक्त करण्याच्या या दिवशी मुक्या प्राण्यांना आपल्या आनंदात सहभागी करून त्यांची केलेली सेवा हे खूप मोठे मानसिक समाधान देणारे असल्याचे या युवकांनी सांगितले आहे .आता दरवर्षी अशाच प्रकारे वेलेन्टाइन डे साजरा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगतले आहे.