ठाणे - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: सह चालक आणि स्वीय साहायकांना शासनाकडून देण्यात येणारे वर्षभराचे वेतन गोरगरिबांच्या कल्याणासाठी सरकारी तिजोरीत जमा करण्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण देशात अशापद्धतीने आपले वेतन सरकारी तिजोरीत जमा करणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
राज्यातील आमदारांच्या वेतनामध्ये कपात केली जाणार असल्याचे मी ऐकले, असे आव्हाड म्हणाले. यानंतर 'माझा वर्षभराचा पगार सरकारी तिजोरीत जमा करून गोरगरिबांच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावा', अशी घोषणा त्यांनी केली.