महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडीत गोदामाला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक - thane news today

सकाळच्या सुमारास भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला सकाळी भीषण आग लागली असून गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली आहे.

fire
fire

By

Published : Dec 27, 2020, 10:52 AM IST

Updated : Dec 27, 2020, 11:23 AM IST

ठाणे -भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून काल मध्यरात्रीच्या सुमारास ९ ते १० खोल्यांना भीषण आग लागून येथील रहिवाशांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. ही घटना उलटून २४ तास होत नाही तोच पुन्हा आज सकाळच्या सुमारास भिवंडी शहरातील झेंडानाका येथील एका भांड्याच्या गोदामाला सकाळी भीषण आग लागली असून गोदामातील सर्व भांडी साहित्य जाळून खाक झाली आहे.

सुदैवाने टळली जीवितहानी

भिवंडी शहरातील गजबजलेल्या झेंडा नाका परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर संसार उपयोगी भांड्यांचे गोदाम आहे. तर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रहिवाशी राहत आहे. आज सकाळच्या सुमारास अचानक भांड्याच्या गोदामातून धूर बाहेर येताना इमारतीमधील रहिवाशाना दिसला. त्याने इतर नागरिक व इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आगीची माहिती देताच, एकच गोंधळ उडाला होता. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गजबजलेल्या वस्तीत या दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या भांड्याच्या गोदामाला आग लागताच पहिल्या मजल्यावरील आणि शेजारील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. हि आग शॉटसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आगीच्या कारणांचा अध्यापही शोध सुरू असल्याचे अग्निशामक अधिकाऱ्याने सांगितले.

२४ तासाच्या आत भीषण आगीची दुसरी घटना

भिवंडी शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १० पत्र्याच्या खोल्या जळून खाक झाल्याने १० कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने खोल्यात राहणाऱ्या ५० ते ६० रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यामुळे मोठी मुनष्यहानी टळली असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. तर दुसरीकडे शहरात अग्नितांडवाच्या घटना सुरूच असून यावर कुठलीही शासकीय यंत्रणा ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

Last Updated : Dec 27, 2020, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details