महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime : केळीच्या वखारीत कोंबड्या ठेवण्यावरून जोरदार राडा; एक गंभीर जखमी

केळीच्या वखारीत कोंबड्या ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद (Fierce fights over keeping chickens) होऊन जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यात एक जण गंभीर जखमी झाला असून ही घटना शहाड फाटक परिसरात असलेल्या केळीच्या वखारीत घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Station Thane) हल्लेखोरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

By

Published : Sep 19, 2022, 3:09 PM IST

Published : Sep 19, 2022, 3:09 PM IST

केळीच्या वखारीत कोंबड्या ठेवण्यावरून जोरदार राडा
केळीच्या वखारीत कोंबड्या ठेवण्यावरून जोरदार राडा

ठाणे : केळीच्या वखारीत कोंबड्या ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद (Fierce fights over keeping chickens) होऊन जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यात एक जण गंभीर जखमी झाला असून ही घटना शहाड फाटक परिसरात असलेल्या केळीच्या वखारीत घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Station Thane) हल्लेखोरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रुपेश महादेव बाबळे, उर्फ पिल्लू (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर तात्याराव नारायण खरात ( वय ६८) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. (Controversy over keeping chickens Thane)


कोंबड्या वखारीत ठेवण्यास नकार दिल्याने मारहाण -उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर १ भागातील शहाड फाटक येथे जखमी तात्याराव यांचा पानाच्या विक्रीचा व्यवसाय मित्र जाहिद खान यांच्या केळीची वखारीत शेजारीच आहे. तर आरोपी पिल्लूचे याच परिसरात मटण विक्रीचे दुकान आहे. काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास तात्याराव हे जाहिद खान यांच्या केळीच्या वखारीत बसले होते. त्याच वेळी आरोपी पिल्लू हा चार कोंबड्या घेऊन केळीच्या वखारीत आला. त्यानंतर कोंबड्या वखारीत ठेवण्यासाठी त्याने येथील मजुरांना सांगत असतानाच तात्याराव यांनी त्याला कोंबड्या वखारीत ठेवल्यास मनाई केली. तात्यारावांनी सांगितले कि, कोंबड्या केळीच्या वखारीत ठेवल्यावर केळीचा माल खराब होईल. त्यामुळे कोंबड्या वखारीत ठेवल्यास त्यांनी नकार दिला. यावरून आरोपी पिल्लूला राग येऊन त्याने तात्याराव यांना शिवीगाळ करत ठोश्याबुक्क्याने मारहाण करत जोरदार राडा घातला.

धमकी देत घटनास्थलावरून काढला पळ -या राड्यादरम्यान वखारीत पडलेली लाकडाची फळी डोक्यात मारल्याने तात्याराव रक्तबंबाळ झाले. ते पाहून दोघांचे भांडण सोडविण्यासाठी वखारीतील मजुरांनी प्रयत्न केले असता आरोपी पिल्लूने त्यांनाही शिवीगाळ करत धमकी दिली. कोणी मध्ये आला तर त्यालाही बेदम मारहाण करू असे बोलून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर वखारीतील मजुरांनी गंभीर जखमी अवस्थेत तात्याराव यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details