ठाणे - बंद घर फोडून फ्रिजच्या कव्हरमधील चाव्यांच्या साह्याने कपाटातील रोकडसह सोन्याचा ऐवज लांबविणाऱ्या दोघांना विष्णूनगर पोलिसांनी अटक ( Thane Vishunagar Police ) केली आहे. अटकेतील एकजण अल्पवयीन आहे. यातील मुख्य आरोपी मेहुणीचे घर साफ करणारा मेहुणा असल्याचे चौकशीदरम्यान ( Thane crime news ) उघडकीस आले आहे.
घाटकोपरमधून आरोपीला अटक
पश्चिम डोंबिवलीच्या लोटेवाडी परिसरातल्या श्री बालाजी चाळीत राहणाऱ्या प्रतीक्षा गोपाळ जाधव (24) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल ( robbery crime in West Dombiwali ) केला. शुक्रवारी सकाळी 7.30 ते रात्री 9 दरम्यानच्या कालावधीत या घरातून रोकाडसह सोन्याचे दागिने ( robbery in Home ) चोरीस गेले होते.
आरोपी निघाला तक्रारदार महिलेचा मेहुणा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव ( Senior PI Pandharinath Bhalerao ) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तसेच गोपनीय माहिती काढून देवेंद्र रघुनाथ खांडेकर (22) याला तो राहत असलेल्या घाटकोपर पश्चिमेकडील संघर्ष नगरमधल्या साई संगम सोसायटीतून ताब्यात घेतले. देवेंद्रने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका 17 वर्षीय चोरट्याला साकीनाका येथून ताब्यात घेतले. यातील देवेंद्र खांडेकर हा तक्रारदार प्रतीक्षा जाधव हिचा नात्याने मेहुणा अर्थात बहिणीचा नवरा आहे.