ठाणे : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रियकराने व्हॉट्सअॅपवर खास महागड्या गिफ्टस्चे स्टेटस expensive gift on WhatsApp status ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीच्या रक्कमेतून प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन त्याचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवल्याने चोरटा प्रियकर अंबरनाथ पोलिसांच्या तावडीत अडकला. राज आंबवले असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. आरोपीने गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Thane Police arrested accused based on WhatsApp status
काढलं होते आरोपीला कामावरून -अंबरनाथ पश्चिम भागातल्या रेल्वे स्थानकानजीक सुनील महाडिक यांच्या मालकीचे ओम श्री साईराम नावाने पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आरोपी राज कामाला होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याने पैश्याची अफरातफर केल्याने त्याला महाडिक यांनी कामावरून काढून टाकले होते. त्यातच २४ ऑगस्ट रोजी महाडिक यांनी घाऊक विक्रेत्याकडून पूजेचे साहित्य घेतले होते. त्याच विक्रेत्या देण्यासाठी रोकड दुकानाच्या गल्ल्यात ठेवली होती. मात्र त्या दिवशी घाऊक विक्रेत्या रोकड घेण्यासाठी आला नसल्याने रोकड गल्ल्यात ठेवून घरी गेले . मात्र २५ ऑगस्ट रोजी दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. तर गल्ल्याची चावीने उघडून त्यामधील दोन लाख रोकड शिवाय एक सोन्याची चेन चोरून नेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर महाडिक यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात रोकड व सोनसाखळी चोरीला गेल्याची अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली.