ठाणे- फुकटच्या सिगरेट देण्यास नकार ( free cigarettes demand by accused ) दिल्याच्या वादातून एका पान शॉप दुकानदाराच्या डोक्यात बीयरच्या बॉटल फोडल्याची घटना समोर घडली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील संभाजी चौक येथील मनीष पान शॉपमध्ये घडली ( Sambhaji Chowk in Ulhasnagar city ) आहे. संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( CCTV of Bottles of beer smashed ) झाला.
दोन बॉटल डोक्यात लागल्याने जखमी-उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या संभाजी चौकात मनीष सिंग यांचे पान शॉपचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी त्याच परिसरात राहणारा एक गुंड प्रवृत्तीचा तरुण फुकटचे सिगारेट घेण्यासाठी पान शॉपवर ( Manish Singhs Pan Shop )आला होता. परंतु दुकानदार मनीष सिंग याने फुकटचे सिगारेट देण्यास नकार ( hit by bottle for free cigarette ) दिला. त्या गोष्टीचा राग येऊन या फुकट्या गँगच्या तरुणाने हातात दोन बिअरच्या बॉटल आणल्या. दुकानात उभे असलेल्या मनीष यांच्या अंगावर बिअरच्या बाटल्या फेकून फेकल्या. यातील एक ते दोन बॉटल डोक्यात लागल्याने पान शॉप दुकानदार जखमी झाला आहे.