ठाणे- उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन 30 परिसरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या सट्टेबाजांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपुत व त्यांच्या पथकातील कर्मचारी रविवारी रात्री हल्लेखोरांपर्यत पोहोचले. त्यांनी हल्लेखोरांना गुजरातमधून अटक केली आहे.
उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन 30 परिसरात क्रिकेट बुकीच्या सट्टेबाजांची आपआपसात पैशाचा वाद झाला होता. कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस शिपाई गणेश डमाळे यांच्यावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तसेच या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गणेश राठोडही जखमी झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली होती.
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणारे सट्टेबाज म्होरक्यासह गजाआड हेही वाचा-तिरुपती ट्रस्टच्या नावाखाली गुजरात येथील व्यक्तीला पावणेतीन कोटीचा गंडा
हल्लेखोरांना गुजरातच्या वापी शहरातील हॉटेलमधून अटक-
गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपुत व त्यांच्या पथकातील जितु चित्ते, मिसाळ, राहुल काळे या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हे गुजरातमधील वापी शहरातील शिवदर्शन हॉटेलमध्ये फरार होऊन लपून बसल्याची माहित पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच रविवारी या पथकाने वापी शहर गाठून हल्लेखोरांच्या मुसक्या आवळुन त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हल्लेखोर सट्टेबाज टोळीचा म्होरक्या नरेश लेफ्टी याच्यासह उमेश उर्फ ओमी, शशी, या हल्लेखोरांना रविवारी रात्री उशिरा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कोठडीत डांबले आहे. तर आणखी 4 हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा-भरधाव ट्रकखाली चिरडून पादचारी ठार; कल्याणच्या सहजानंद चौकातील घटना
पोलिसांवर हल्ल्याच्या 'त्या' दिवशी नेमक काय घडले?
14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन पोलीस परिसरात गस्त घालत होते. त्यातच सट्टेबाज टोळीचा प्रमुख संजय शितलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारातून वाद होते. नरेश हा संजयकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यामुळे अविनाश नायडू याने संजयकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी संजय आणि अविनाश हे उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागात गुरुवारी 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सट्टेबाज नरेशला भेटण्यासाठी आले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये पैशावरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी एकमेकांवर चाकू आणि इतर इतर धारदार हत्यारांनी त्यांनी आपआपसात जीवघेणा हल्ला केला. दोन गटात रक्तरंजित राडा सुरू असतानाच गस्तीवरील पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड यांनी दोन्ही गटात मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही पोलिसांवर चाकूने वार करीत जीवघेणा हल्ला केला.
हेही वाचा-जात पडताळणी विभागाचे उपायुक्त 1 लाख 90 हजारांची लाच स्वीकारताना 'एसीबी'च्या जाळ्यात
3 ते 4 जणांच्या हत्या झाल्या असत्या-
हल्ल्यात अंमलदार डमाले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्यात गंभीर जखमी पोलीस शिपाई डमाळे यांनी वेळीच जर हल्लेखोराना रोखले नसते तर 3 ते 4 जणांची हत्या झाली असती. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.