महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण रेल्वेस्थानकावर बोगस टीसीला अटक - ठाणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

लॉकडाऊन काळात पर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसोबत लुटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. रेल्वे प्रवाशांची बोगस टीसीने लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकात या तोतया टीसीला अटक केली असून, अश्रफ अली असे त्याचे नाव आहे.

कल्याण रेल्वेस्थानकावर बोगस टीसीला अटक
कल्याण रेल्वेस्थानकावर बोगस टीसीला अटक

By

Published : May 4, 2021, 10:09 PM IST

ठाणे -लॉकडाऊन काळात पर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसोबत लुटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. रेल्वे प्रवाशांची बोगस टीसीने लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकात या तोतया टीसीला अटक केली असून, अश्रफ अली असे त्याचे नाव आहे.

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासताना रंगेहात ताब्यात

कल्याण रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार राजू आखाडे नेहमीप्रमाणे फलाटावर गस्त घालत होते. यावेळी फलाटावर आलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये एक तरुण प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचे आढळून आला. पोलीस कर्मचारी आखाडे यांना संशय आल्याने त्यांनी रेल्वेच्या अधिकृत टीसीला बोलावून घेत, या तरुणाबाबत शहानिशा केली असता तो तोताया टीसी असल्याचे लक्षात आले. या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण रेल्वेस्थानकावर बोगस टीसीला अटक

आरोपी निघाला विमा एजंट

दरम्यान अश्रफ अली असे या तरुणाचे नाव आहे, तो विमा एजंट म्हणून काम करतो. मात्र लॉकडाऊनमुळे ग्राहक मिळत नसल्याने , त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.

हेही वाचा -खा. सुजय विखे रेमडेसिवीर वाटप प्रकरण : राजकीय हेतूसाठी इंजेक्शन वाटप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

ABOUT THE AUTHOR

...view details