महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे : दृष्टीहीन विद्यार्थ्याचे नेट परीक्षेत 'नेत्रदीपक यश' - blind student passed NET exams in thane

शहरातील लोकमान्य नगर पाडा परिसरात राहणाऱ्या एका दृष्टीहीन विद्यार्थ्याने नेट आणि सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना घाम फोडणाऱ्या या परीक्षेत जयेश कारंडे याने मात्र पहिल्याच प्रयत्नान यश संपादन केले. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

blind student passed NET exams in thane
ठाणे : दृष्टीहीन विद्यार्थ्याचे नेट परीक्षेत 'नेत्रदीपक यश'

By

Published : Dec 5, 2020, 1:28 PM IST

ठाणे - शहरातील लोकमान्य नगर पाडा परिसरात राहणाऱ्या एका दृष्टीहीन विद्यार्थ्याने नेट आणि सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना घाम फोडणाऱ्या या परीक्षेत जयेश कारंडे याने मात्र पहिल्याच प्रयत्नान यश संपादन केले. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ठाणे : दृष्टीहीन विद्यार्थ्याचे नेट परीक्षेत 'नेत्रदीपक यश'

डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर तर चार पावलं चालताना देखील आपण अडखळतो. मात्र दृष्टीहीन असूनही ठाण्याच्या जयेश कारंडे यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ट्वेंटी-ट्वेंटीत अर्थात नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून दृष्टीहीन असूनही त्यांनी मिळवलेले यश डोळस समाजाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील विरांश कोचिंग क्लासेसचे संचालक जयेश कारंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण केली. शालेय शिक्षण आरजे ठाकूरमधून झालेल्या जयेश यांनी एमबीए देखील पूर्ण केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जयेश हे दृष्टीहीन असूनही त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टच्या यशाला गवसणी घातल्याने भविष्यात ते प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत.

चाळीतील घरातून आखला यशाचा महामार्ग

लोकमान्यनगर परिसरात दाटीवाटीने असलेल्या चाळीमध्ये जयेश राहतात. दृष्टीहीन असूनही प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश खेचून आणले. परीक्षेत रायटर घेऊन त्यांनी यशाचा मार्ग आखला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details