महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJYM Against Nana Patole : नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून ( Nana Patole Controversial Statement ) वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन ( BJYM Demand Treason Against Nana Patole ) दिले.

नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी
नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

By

Published : Jan 18, 2022, 7:59 PM IST

ठाणे - नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून ( Nana Patole Controversial Statement ) संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटत असताना ठाण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन देण्यात ( BJYM Demand Treason Against Nana Patole ) आले.

नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

पटोलेंचे वक्तव्य निंदनीय

यावेळी नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय असून, देशातील कायदा व सुव्यवस्था खराब करण्या सारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका ( PM Narendra Modi ) निर्माण करण्याचा काँग्रेसचा मनसुबा तर नाही, असा संशय यावेळी भाजपचे युवा मोर्चा अधिकारी मयुरेश जोशी यांनी केला. तर वैचारिक पातळीवर नरेंद्र मोदी यांना कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे विचारांनी विचाराचा लढा न देता अशाप्रकारे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करन्याची मागणी भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली.

काय म्हणाले नाना पटोले?

भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडलेले आहे. तक्रारकर्ते आणि नागरिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. देशातील मुद्यांवरून लक्ष भरकटण्याचे काम भाजपच्या लोकांकडून केले जात आहे. देशात बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे. त्याकडे दुर्लक्ष करून भाजप वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. यात प्रधानमंत्री पद देशाचे आहे. ते कुण्या एका पक्षाचे नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले आहे. त्यापदाचा गौरव आणि गरिमा चांगल्या पद्धतीने माहित आहे. मात्र, ज्या पद्धतीने भाजप राज्यात कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करत आहे. ते चुकीचे आहे. कुठलेही कारण नसताना अटकेची मागणी करत आहे. लोकांनी मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार केली नसेल आणि त्या नावाचा गावगुंड नसेल तर म्हणाले नक्कीच माझ्यावर कारवाई करा, असे सांगितल्याचे नाना पटोले म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details