ठाणे -जिल्ह्यात शहापूर व मुरबाडनगरपंचायत निवडणुकीच्या ( Shahapur-Murbad Elections ) प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच एका घटनेमुळे प्रचार चांगलाच गाजला आहे. एकमेकांचे राजकीय वैर असलेल्या शिवसेनेच्या प्रचार फेरीतील बच्चे कंपनीने समोरून येणाऱ्या भाजपाच्या प्रचार फेरीतील घोषणाबाजीला प्रतिसाद देत, भाजपाचा जयजयकार केल्याचे एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्र्यांसह नेत्यांना मनातल्या मनात गुदगुल्या झाल्यासारखे झाले आणि हा संपूर्ण प्रकार पाहून त्यांनाही हसू आवरले नाही.
मुरबाड नगरपंचायतच्या 17 प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये चार प्रभागात ओबीसीचे आरक्षण असल्याने ते चारही प्रभाग वगळून इतर प्रभागात निवडणुकीच्या प्रचार धुमधडाक्यात सुरु आहे. त्यातच प्रभाग क्र. 10 मधील शिवसेनेच्या उमेदवार मोनिका शेळके विरुद्ध भाजपाच्या वैशाली घरत यांच्यात सरळ लढत आहे. तर एकमेव अपक्ष उमेदवार मंदा चिराटे याही नशीब अजमावत आहेत. आज सुट्टीच्या दिवशी प्रभागात केंदीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची प्रचार फेरी सुरु होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार फेरी आमनेसामने आली.
शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उडाला गोंधळ -