ठाणे- पीएमसी बँक बुडाली आणि सामान्य नागरिक देशोधडीला लागले. हाल अपेष्टा भोगून जमा केलेला पैसा अडकल्याने सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. जन आक्रोशाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साथ मिळाली असून या सगळ्याला युतीचे बडे नेतेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - पीएमसीच्या खातेदारांना दिलासा; खात्यामधून १० हजार रुपयापर्यंत काढता येणार रक्कम
बुडालेल्या पीएमसी बँकेचे संचालक भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा असल्याचे त्याच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लबने पीएमसी बँकेत असलेले करोडो रुपये आधीच काढून घेतले. याचा अर्थ त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती होती. मात्र, सामान्य गरिबांनाच कोणी वालीच राहिला नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ
नोटबंदीच्यावेळी देखील स्वतःच्या करोडो रुपयांसह आपले करोडो रुपयेदेखील स्वतः रावसाहेब दानवे यांनीच बदलून दिल्याचा खळबळजनक आरोप अब्दुल सत्तार यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. जर सत्ताधाऱ्यांना या सगळ्या बातम्या कळतात. मग तुम्हाला सत्तेत बसवणाऱ्या मतदारालाच याची जाणीव नसते. त्यामुळे सामान्य नागरिक रस्त्यावर आल्याचा आरोप त्यांनी केला.