महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप आमदाराच्या कारला मोटारसायकलची जोरदार धडक; दुचाकीवरील तरुण-तरुणी ठार - road accident in thane

terrible accident in thane
भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात

By

Published : Dec 13, 2020, 8:09 PM IST

Updated : Dec 13, 2020, 9:33 PM IST

20:00 December 13

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक महिला गंभीर

ठाणे -मुरबाड मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या कारने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. हि घटना मुरबाड तालुक्यातील दहागाव आपटी रस्त्यावर घडला असून घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस दाखल झाले आहेत. 
 

आमदाराची कारही क्षतिग्रस्त होऊन समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र कारमधील जखमी आणि मृत दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होऊन दुचाकीवरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती. त्यामुळे तीही गंभीर जखमी झाली आहे.   

मोटरसायकलवरील तरुण-तरुणी जागीच ठार -

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरबाड मतदारसंघातील आमदार किसन कथोरे हे पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी 6 वाजून 45 वाजता अनखर पाडा, गोवेली, वाहोली मार्गे बदलापूरकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला समोरून मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण अमित नंदलाल सिंग (वय २२ रा, नेतेवली, कल्याण) याचा जागीच मृत्यू झाला तर सिमरन दीपक सिंग ( १८, नेतेवली, कल्याण) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आमदार किसन कथोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आमदारांच्या कारचा चेंदामेंदा -
मात्र अपघातात आमदाराची कारही क्षतिग्रस्त होऊन समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. तर आमदारासोबत कारमध्ये असलेले अंगरक्षक माळी, स्वीय सहायक महेश सावंत सुखरूप आहेत व वाहन चालक किरकोळ जखमी आहे. मात्र दुचाकी वरील गंभीर तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होऊन दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात २० फूट लांब उडून खाली पडली होती. 
 

दरम्यान, आमदार कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनस्थळी कल्याण तालुका पोलीस पंचनामा करून अपघाताची नोंद करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

Last Updated : Dec 13, 2020, 9:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details