नवी मुंबई - प्रधानमंत्री आवास योजना देशातील प्रत्येक नागरिकाला घर मिळावे म्हणून आणली आहे. मात्र नवी मुंबईतील पार्किंग क्षेत्र उध्वस्त करून, तेथे ही आवास योजना राबविण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्यामुळे ही आवास योजना सिडकोने नवी मुंबई नजीक असणाऱ्या नैना क्षेत्रात राबवावी, अशी मागणी आमदार व भाजपा नेते गणेश नाईक यांनी केली आहे.
नैना क्षेत्रा अंतर्गत हजारो एकर जमीन सिडकोकडे येणार नवी मुंबई नजिक नैना प्रकल्प अंतर्गत हजारो एकर जमीन सिडकोकडे येणार आहे. त्यातील 22 टक्के जागा शेतकऱ्यांना विकसित करून दिली व दहा टक्के जागा इतर ठिकाणी वापरली तर 65 टक्के जागा ही सिडकोकडे असणार आहे.
पार्किंगसाठी असणाऱ्या राखीव जागा उध्वस्त करून, घातलेत इमारती बांधायचा घाट
सिडको नवी मुंबई मधील कार पार्किंग सायकल पार्किंग, बाईक पार्किंगसाठी असणाऱ्या जागा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इमारती उभारण्याचा घाट घालत आहे. असा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला. तसेच नवी मुंबई शहरात आणखी इमारती उभारणे म्हणजे आणखी दाटी वाढण्याची स्थिती निर्माण करणे असे होईल, यामुळे शहरात प्रचंड पाणी प्रश्न निर्माण होणार, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. सिडकोकडे नैना प्रकल्पाच्या अंतर्गत हजारो एकर जमीन, येणार आहे. त्यामुळे सिडकोने नवी मुंबईतील पार्किंग क्षेत्र उध्वस्त न करता नैना परिसरात आवास योजनेचा इमारती उभारण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.