ठाणे -परमबीर सिंह ( Param bir Singh ) आणि शिवसेनेचੇ साटेलोटੇ असल्याचੇ आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांचे ( Anil Deshmukh ) नाव घेतल्यानंतर शिवसेनेच्या अनिल परब ( Anil Parab ) यांचे नाव घेऊ नये म्हणून शिवसेना परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांनी सिंह यांना निलंबित केले नाही, असेही भातखळकर म्हणाले.
नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी माझ्यावर कोणी तरी पाळत ठेवत असल्याचे ट्वीट केले आहे. यावर भातखळकर म्हणाले, ते हर्बल तंबाखू खावून बोलत असतील. त्यांना जर तसे वाटत असेल तर गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत, त्यांच्याकडे मलिकांनी तक्रार करावी, असेही भातखळकर म्हणाले. गृहखात्यावर विश्वास नसल्याने त्यांनी तक्रार केली नसेल, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.