नवी मुंबई - नवी मुंबई शहराचा कारभार गेल्या 25 वर्षांपासून गणेश नाईक यांच्या विचारसरणीने सुरू असल्याचे व्यक्तव्य भाजपा नेते आमदार गणेश नाईक यांनी केले आहे. तसेच गणेश नाईकांच्या विचारसरणीचेच नगरसेवक शहरात निवडणूक आले आहेत, असेही त्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी सवांद साधताना म्हटले आहे. ते नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यासाठी आले होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील भाजपाच्या नगरसेवकांवर राज्य सरकारकडून दबाव आणला जात आहे. त्यामुळे 2020 ते 2021 या कालावधीत नगसेवकांनी गणेश नाईक यांना धक्का देत शिवसेना व काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असा आरोप वेळोवेळी भाजपाचे नेते, आशिष शेलार व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
नगरसेवक सोडचिठ्ठीवर स्पष्टीकरण
गणेश नाईक यांना धक्का देत भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नगरसेवकांच्या संदर्भात गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिले असून 1997पासून 2021पर्यंत माझ्याबरोबर असणाऱ्या कित्येकांनी पक्ष सोडला आहे. मात्र तरीही नवी मुंबई शहरात 1995 ते 2021पर्यंत गणेश नाईकांच्याच विचारसरणीचे नगरसेवक निवडून आले आहेत. गणेश नाईक यांच्या विचारसरणीने या शहराचा कारभार गेली 25 वर्षे चालला आहे, असेही ते म्हणाले. पक्ष सोडून गेलेल्यांना शुभेच्छा द्यायला नाईक विसरले नाहीत.