ठाणे -पावसामुळे रस्त्यांची अवस्था खराब होऊन रस्त्यांवर दरवर्षी मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. पावसाच्या पाण्यामुळे अशा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अशा खड्ड्यांमध्ये पडून अनेकदा अपघात होतात. मंगळवारीही एक दुचाकीस्वार साडेतीनच्या सुमारास अशाच एका खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडला. ( Biker Fell Into Ditch ) तो खड्ड्यात पडला त्याचवेळी मागून एसटी महामंडळाची बस येत होती. या बसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ( Biker Dead In Accident ) या घटनेप्रकरणी काशिमीरा पोलिस्ट स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खड्ड्याने घेतला पहिला बळी -यावर्षीच्या पावसात पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्याने पहिला बळी घेतला आहे. काजूपाडा, घोडबंदर रोडवरून हा तरुण ठाणेकडून मुंबईकडे चालला होता. या रस्त्यावरी खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन तो दुचाकीवरून रस्त्यावर पडला व त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता असल्याने तात्काळ खड्डे बुजवण्यात आदेश देण्यात आले आहेत.