महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...म्हणून 'त्याने' बहिणीला 'अशा' दिल्या अनोख्या शुभेच्छा

साहू यांनी टाळेबंदीच्या काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती केली होती. गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीचा संदेश त्यांनी नागरिकांना दिला होता.

डोक्यावरील केसात लिहून कोरोनाविषयी जनजागृती
डोक्यावरील केसात लिहून कोरोनाविषयी जनजागृती

By

Published : Nov 16, 2020, 3:51 PM IST

Updated : Nov 16, 2020, 4:51 PM IST

ठाणे- भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या नाते अधिक घट्ट करणारा सण मानला जातो. यंदा, मात्र देशभरात करोनाचे संकट असल्यामुळे भाऊबीज एकत्रितपणे साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. बिहारला गावी जाता आले नाही म्हणून, एका भावाने डोक्यावरील केसात 'हॅपी भाईदुज' असे अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही बहिणींचा आशीर्वाद घेतला. शंकरकुमार साहू असे या तरुणाचे नाव आहे.

शंकर साहू हे मूळचे बिहार राज्यातील गया जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. ते भिवंडीतील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेल्या ९ वर्षांपासून साहू राहतात.

डोक्यावरील केसात लिहून कोरोनाविषयी जनजागृती
गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील केसात अक्षर कोरून कोरोनाविषयी जनजागृतीकोरोनाच्या काळात सुरुवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी साहू यांनी टाळेबंदीच्या काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती केली होती. गेल्या ७ महिन्यात ७ वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीचा संदेश त्यांनी नागरिकांना दिला होता. 'ई टीव्ही भारत'ने मे महिन्यात त्यांच्या कोरोनाविषयी सुरू असलेल्या जनजागृतीबाबत बातमी प्रसिद्ध केली होती.
डोक्यावरील केसात 'हॅपी भाईदुज' असे अक्षर कोरून शुभेच्छा



बहिणीच्या आठवणीने झाला भावुक -
शंकरकुमार यांना तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघीही बिहारमधील गया जिल्ह्यात राहतात. तर एका बहिणीचे निधन झाले. शंकरकुमार सांगतात की, भिवंडीत वर्षभर काम करीत असताना केवळ मूळगावी बहिणीसोबत दिवाळी साजरी करणासाठी दरवर्षी जात होतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी 'हॅपी भाईदुज' अक्षरे कोरली आहेत. व्हिडिओ कॉलिंग करून बहिणींचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी भावूक होऊन सांगितले.

Last Updated : Nov 16, 2020, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details