भिवंडी -मुक्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्यांची परस्पर विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील फातमानगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या फरीदा अंसारी (वय ४०) आणि तिचा मुलगा तौफिक (वय १७) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरीदाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरमान इस्तियाक अंसारी (६ महिने) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खळबळजनक ! खेळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री, माय-लेकावर गुन्हा - Bhiwandi Police News
मुक्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्यांची परस्पर विक्री केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्या आल असून महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपहरण झालेल्या बाळाची आई अस्मा ( वय.३० ) आणि वडिल इस्तियाक (वय.३५ ) हे दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी महिला फरीदा अंसारी व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून त्याची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माय - लेकाने या मुलाला गायब करण्याच्या हेतूने सुरुवातीला ५ डिसेंबरला त्याला घरातून नेवून त्याला ६ डिसेंबरला परत घरी आणले. त्यानंतर पुन्हा ६ डिसेंबरला सायंकाळी त्याला घरातून नेवून १६ डिसेंबरला त्याला परत घरी आणले. मात्र, पुन्हा १६ डिसेंबरला नेवून २१ डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र, पुन्हा त्याला २२ डिसेंबरला दुपारी खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेवून गायब केले आहे.
बाळ गायब असल्याच्या घटनेची खबर इस्तियाक याचा भाऊ इलियास अंसारी याला समजताच त्याने याबाबत अधिक चौकशी केली. यावेळी शेजारची महिला फरीदा व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून ठेवले आहे असे समजले. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर हतबल झालेल्या इलियास यानी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून फरीदा व तिचा मुलगा तौफिक या दोघांच्या विरोधात कलम ३६३ ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या प्रकणी पोलिसांनी मुलाचा कसून शोध सुरु केला आहे.