महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडी इमारत दुर्घटना: सलग चौथ्या दिवशीही ढिगाऱ्याखालील मृतदेहाचा शोध

भिवंडी इमारतीची दुर्घटना उलटून 72 तास उलटले तरी अद्याप बचावकार्य सुरू आहे. 2 वर्षाच्या चिमुरडीचा अद्याप शोध लागला नाही.

भिवंडी इमारत दुर्घटना
भिवंडी इमारत दुर्घटना

By

Published : Sep 24, 2020, 12:45 PM IST

ठाणे -भिवंडी शहरातील जिलानी इमारतीच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य सलग चौथ्या दिवशी सुरू आहे. धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंडमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास जिलानी नावाची तीन मजली इमारत अचानक कोसळली होती.

सलग चौथ्या दिवशीही ढिगाऱ्याखालील मृतदेहाचा शोध

बचाव पथकाने आज (गुरूवारी ) पहाटे साडेतीनच्या सुमारास जिलानी इमारतीच्या दुर्घटनेतील मदतकार्य थांबविले होते. मात्र, 2 वर्षीय मुसेफ शब्बीर कुरेशी या चिमुरडीचा शोध लागला नाही. त्यामुळे बचाव पथकाने चौथ्या दिवशीही श्वानांच्या मदतीने शोध कार्य सुरू ठेवले. कोसळलेल्या 3 मजली इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम दोन जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहे. सध्याच्या स्थितीत तळमजलापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

मृतांच्या आकडेवारीत तफावत-

बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मते एकूण दुर्घटनेत 41 जणांचा बुधवारी सायंकाळपर्यंत घटनास्थळी बळी गेला आहे. तर स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाच्या अहवालानुसार 38 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे एनडीआरएफ, टीडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडे असलेल्या मृतांच्या आकडेवारीत तफावत असल्याचे आढळून आले आहे.

अद्यापही शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जोपर्यंत शवविच्छेदनाचे सर्व अहवाल येत नाहीत, तोपर्यत महापालिका प्रशासन मृतांची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करणार नाही. प्रशासनाकडून आज सायंकाळपर्यत मृतांच्या नावांसह अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details